सुनील भंडारे पाटील
काळाच्या ओघांमध्ये सद्यस्थितीत सुधारित तंत्रज्ञान याला खूप
महत्त्व आहे, जुनं ते सोनंच फक्त बनून राहते, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल
तंत्रज्ञानाचा सध्या समाजामध्ये खूपच वापर होत असून, समाजाने देखील सर्व
क्षेत्रात ते अवगत केले आहे, सुधारित
तंत्रज्ञान मध्ये इंटरनेट, संगणक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्व
गोष्टी एकाच तंत्रज्ञानात ते म्हणजे भ्रमणध्वनी (मोबाईल),हल्ली संपर्क,
मेसेज,इतर सर्व माहिती काही क्षणात मिळते, समाजामध्ये अपघात, नैसर्गिक
आपत्ती, सामाजिक प्रश्न, आंदोलने, निवडणुका, राजकीय नियुक्त्या, शासकीय
नियुक्त्या, याबाबतीत बातम्या व माहिती अगदी काही क्षणात जगामध्ये प्रसिद्ध
होते, पूर्वीसारखे आता राहिले नाही, आज आत्ता घडलेली घटना प्रसार
माध्यमातून तीन चार दिवसांनी समजायची, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब
अगदी काही क्षणात लोकांना न्यूज पोर्टल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या
माध्यमातून समजते, त्यामुळे या प्रसार माध्यमांना समाजातून प्राधान्य दिले
जाते, आपला जीव धोक्यात घालून काही क्षणात समाजामध्ये प्रसारित करणाऱ्या
न्यूज पोर्टलला देखील समाजामध्ये मानाचे स्थान मिळवण्यासाठी शासनाने व
सरकारने कायदेशीर सर्व अधिकार द्यायला हवेत,
एकदम
कमी क्षणात बातम्या पोचून समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या न्यूज
पोर्टलला संरक्षण थोडे कमी असल्याने खोट्या बातम्या टाकण्याचे धाडस कोण करत
नाही , सत्याला व पुराव्यानिशी बातम्यांना जास्त प्राधान्य दिले जाते
त्यामुळे त्या लोकांना योग्य वाटतात, अशा बातमी दारांना खरंच संरक्षण देऊन
त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी पात्र धरले पाहिजे,