हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहून उल्लेखनीय कार्य करणारे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे
यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका व बोलाई माता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला, त्याचप्रमाणे भरारी न्यूज च्या माध्यमातून समाजामध्ये चांगले काम करणारे संपादक ज्येष्ठ पत्रकार सुनील भंडारे (पाटील) यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला,