सुनील भंडारे पाटील
गेले अनेक वर्षापासून शिवसंग्राम च्या माध्यमातून, राज्यामध्ये मराठी समाजासाठी आरक्षणासाठी लढा देत असणारे, आमदार विनायक मेटे, आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबई येथे जात असताना, पुणे मुंबई या द्रुतगती मार्गावर मांडूप बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला,
अपघातानंतर त्यांना मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला, आज सकाळी पहाटे विनायक मेटे, आणि त्यांचे मित्र बीडहून मुंबईकडे जात असताना पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला, आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीसाठी चे नियोजन होते, दरम्यानच्या काळात ही घटना घडल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, तसेच आमदार प्रवीण दरेकर, इतर कार्यकर्त्यांसह रुग्णालयाकडे धाव घेतली, अंधारात एका आज्ञात वाहनावर मागून मेटेची गाडी धडकली, ड्रायव्हरने सांगितले, अपघात एवढा भीषण होता की गाडीची डावी बाजू पूर्णपणे उध्वस्त झाली, त्या बाजूला मेटे बसलेले होते, अपघातानंतर सुमारे एक तास कसलीच मदत मिळाली नाही. अक्षरशा मदतीसाठी रस्त्यावरील गाड्यांना मी आडवा झोपलो होतो तरी गाड्या थांबले नाहीत, मी देखील जखमी होतो, गाडीच्या एअर बॅग मुळे आम्ही वाचलो, दरेकर यांच्या अंगरक्षकाला फोन केला त्यानंतर मदत मिळाल्याचे मेटे यांच्या चालकाने सांगितले आहे,