शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता शिरूर) माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत माळवाडी ग्रामविकास परिवर्तन पॅनलची सत्ता आली आहे.
माळवाडी ग्रामपंचायत टाकळी हाजी मधुन विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली या ग्रामपंचायतीची पहीलीच निवडणुक झाली.माजी उपसरपंच सोपानराव भाकरे यांच्या नेतृत्वा खालील ग्रामविकास पॅनल व चेअरमन दौलतराव भाकरे यांच्या नेतृत्वा खालील परीवर्तन ग्रामविकास पॅनल मधे निवडणुक झाली.यामधे परिवर्तनचे सहा तर ग्रामविकासला एक जागा मिळाली .
विजयी उमेदवार : वार्ड क्र -१ अदिनाथ शिवाजी भाकरे, निलम अनिल रसाळ, सुनिता सुरेश भाकरे ( ग्रामविकास पॅनल )
वार्ड क्र -२ आनंदा विठ्ठल भाकरे, साधना राहुल गारुडकर,
वार्ड क्रमांक - ३ - सोमनाथ रसिक भाकरे, पुजा दौलत पांढरकर या विजयी झाले आहे .
विरोधी पॅनलच्या सुनिता सुरेश भाकरे या निवडुन आल्या.या पॅनलचे नेतृत्व चेअरमन दौलत भाकरे, माजी उपसरपंच मच्छिद्र भाकरे, नवनाथ रसाळ , लहु भाकरे, प्रविण भाकरे यांनी केले .या विजयी उमेदवारांचा सत्कार माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे,राजेंद्र गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या वेळी चांदाशेठ गावडे, प्राचार्य आर .बी गावडे उपस्थित होते.या पॅनलचे नेते दौलत भाकरे म्हणाले की आम्ही माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शना खाली हि निवडणुक लढविलेली होती आम्ही पक्ष व गावडे कुंटुबाशी प्रमाणिक आहोत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास केला जाईल.माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की गावच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल .