गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
वळती ( तालुका आंबेगाव) येथील भोकर वस्ती व गांजेवाडी प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी भागडेश्वर डोंगर चढून सर केला .
भागडेश्वर मंदिरा वरती शाळेतील मुलांची सहल शिक्षक घेऊण गेले होतो मंदीरात येऊन दर्शन मुलांनी डोंगर चढायला सुरुवात केली एक तासात डोंगर चढून पार केला वरती जाऊण आनंद व्यक्त केला.
भागडेश्वर लेणी, आंबेगाव तालुक्यातील एकमेव लेणी आहे.ही डोंगररांग म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पुर्वेकडील डोंगर रांग होय. उत्तरेकडून औरंगपूर, पुर्वेकडुन भागडी, दक्षिणेस वळती आणि पश्चिमेला गांजवेवाडी अशी या गावांच्या मध्ये दक्षिणोत्तर जवळपास तीन ते चार कि.मी पर्यंत पसरलेली ही डोंगर रांग आहे. याच डोंगर माथ्यावरुन आपणास औरंगपुर ते भागडेश्वर असा ट्रेक करता येतो. डोंगर माथ्यावर जंगलव्याप्त सपाट भुभागामध्ये येथील वनराई असल्याने, अनेक विविध पक्षी, प्राणी व वनस्पतींचा वारसा या परिसरास लाभलेला आहे. पुर्व पट्यातील एकमेव भटक्या पर्यटकांची जणू ही पंढरीच. येथे फिरताना मोकळा श्वास घेता येतो. ट्रेकसाठी तर सर्वोत्तम पुर्व भागातील हा मार्ग म्हणता येईल. आणि तो पण डोंगराच्या क्षितीजावरून. दोन्ही बाजूचे नयनदृष्य एकाच वेळी सहज टिपता येते एवढे निकट असलेला हा पायवाट मार्ग आहे. दुरवरून कानी येणाऱ्या विविध पक्षी व प्राण्याचे आवाज मनमोहीत करतात.शाळेतील मुले डोगंर उतरुण खाली आले वर शाळेतील शिक्षक उकिरडे मॅडम, डेरे मॅडम, अवचिते सर, जाधव सर, यांनी मुलांना जेवण व नास्टा दिला,