पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाकळी हाजी शाखेकडून आर्थिक व डिजीटल साक्षरता प्रशिक्षण कॅम्प

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी
          टाकळी हाजी( ता. शिरुर )परिसरातील शेतकरी,महिला, जेष्ठ नागरिक व युवक युवतीं शालेय विद्यार्थी यांच्यासाठी नाबार्ड व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा - टाकळी हाजी ता. शिरुर च्या वतीने  नविन खाते उघडण्यासाठी बुधवार दिनांक  २४ ऑगस्ट २०२२ रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर टाकळी हाजी येथे "आर्थिक व डिजीटल साक्षरता प्रशिक्षण कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने नवीन बचत खाती उघडून घेणे, त्यांना २ लाख विम्याचा, बँकेचं ए टी एम कार्ड व बँकेच्या शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज ,गृह कर्ज , आपत्कालीन कर्ज, व्यापारी नजर गहाण कर्ज आणि इतर  बँक कर्ज तसेच विविध योजना याबाबत माहिती देवून जागृती करण्यात आली. 
          गाव १०० टक्के आर्थिक व डिजिटल व्हावे यासाठी गावचे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे,माजी पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे ,ग्रामपंचायत सदस्य गोविंद गावडे आणि अशोक गावडे यांनी पुढाकार घेऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले.
        याकामी बँकेचे शाखा अधिकारी राजेंद्र चाटे, संगीता शेवाळे , मनोज बोखारे आणि त्यांचे सहकारी यांनी नागरिकांना योजनेची माहिती देवून नवीन सभासदांना  तात्काळ नवीन खाते उघडून देण्यात आले.  
             यावेळी पोलिस पाटील शोभाताई मंदिलकर,सुमन साळवे, सुरैया पठाण,  प्रवीण गुगळे, बाबाजी सोदक, प्रदिप काळे , विक्रम घोडे, पांडुरंग खाडे, सोमनाथ वरखडे, देविदास पवार, हरिदास गावडे तसेच शालेय विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!