आरोपींच्या जामीनासाठी न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करणा-या दोन आरोपींना अटक

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी 
      दि .२० / ०८ / २०२२ रोजी १५:३० वा . चे सुमारास दिवाणी व फौजदारी न्यायालय , शिरूर येथे शिरुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५३/२०२२ भा.दं.वि.क. ३२८ वगैरे गुन्हयातील आरोपी नावे संगमेश मणिकासा हलींगे यास जामीन राहण्यासाठी नागेश प्रदिप जोशी व आदित्य प्रदिप जोशी या व्यक्तींनी त्याचे नावाचा प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले    
मा . न्यायालयाचे सतर्कतेमुळे त्यांनी त्यांचे कर्मचा-यांना सदरचे प्रतिज्ञापत्राची पडताळणी करणेबाबत आदेशित केल्यानंतर न्यायालयीन कर्मचारी यांना त्या कागदपत्रामधील आधार कार्ड हे वेगळया बनावटीचे व त्यावरील आधार क्रमांक हा बहुतांशी एकमेकांशी मिळते जुळते दिसुन आल्याने त्यांनी त्या इसमांची वारंवार सखोल चौकशी केली असता त्यांनी आपले खरे नांव १ ) शिवाजी अशोक जाधव रा.पोखरकर हॉस्पीटल शेजारी , पुणे २ ) दत्ता राजु देवकर वय २७ वर्ष , रा . पारगाव , खंडाळा , ता . जि . सातारा असे असल्याचे सांगितले . तद्नंतर सदरचे आधारकार्ड महा - ई - सेवा केंद्रात जावुन व्हेरीफाय केले असता त्यामध्ये तफावत आढळुन आल्याने त्यांचे मुळ आधारकार्ड व्हेरीफाय केल्यानंतर त्यांचे मुळ नाव व पत्ता वरीलप्रमाणे समोर आलेला आहे . याबाबत मा . न्यायालयाने सदर आरोपीविरूदध शिरूर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दिल्यानंतर श्री महेश विजय झगडे वय ५३ वर्ष , दिवाणी व फौजदारी न्यायालय शिरूर यांचे फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं .५७० / २०२२ भा.दं.वि.क. ४२०,४६५ , ४७१ , १ ९ ८ प्रमाणे दि . २१/०८/२०२२ रोजी गुन्ह दाखल करण्यात आलेला असुन आरोपी नावे १ ) शिवाजी अशोक जाधव वय ३५ वर्ष , रा . पोखरकर हॉस्पाउल शेजारी , पुणे २ ) दत्ता राजु देवकर वय २७ वर्ष , रा . पारगाव , खंडाळा , ता . जि . सातारा यांना दि . २१/०८/२०२२ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे . अटक आरोपींना रिमांडकामी हजर केले असता मा.न्यायालयाने सदर आरोपीची दि . २५/०८/२०२२ रोजीपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे . गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोसई अभिजीत पवार करीत आहेत . सदरची कारवाई मा . प्रथवमर्ग न्यायदंडाधिकारी , शिरूर न्यायालय तसेच मा.पोलीस अधीक्षक  पुणे ग्रामीण अभिनव देशमुख ( भा.पो.से. ) , मा . अपर पोलीस अधीक्षक , पुणे विभाग मितेश घटट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी  , शिरूर उपविभाग यशवंत गवारी , पो.नि.सुरेशकुमार राऊत शिरूर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अभिजीत पवार , सहा फौज . नाजिम पठाण , पो . अं . आकाश नेमाणे , पो.अं.  संतोष साळंके यांनी केलेली आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!