सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथील पश्चिम बाजूच्या डोंगरावरील भगवान शंकराचे जागृत देवस्थान नरेश्वर मंदिरामध्ये, श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार निमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती,
नुकतेच एका भाविकांनी श्री नरेश्वरा मंदिरामध्ये तब्बल दीड किलो चांदीचे शिवलिंग अर्पण केलेले होते, निनावे दिलेल्या या भेटीचे सर्वत्र कौतुक झाले असून, महिन्याच्या दर सोमवारी दर्शनासाठी गर्दी तर असतेच, परंतु श्रावण महिन्यामध्ये श्री नरेश्वर मंदिरामध्ये गर्दी असते, सणसवाडी गावापासून दोन किलोमीटर स्थित असलेल्या पश्चिमेकडील डोंगर टेकडीवर असलेले पुरातन मंदिर, भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे, अंतर लांब असून देखील आसपासच्या गावांमधील व सणसवाडी वाडे वस्तीवरील महिला, अबाल, वृद्ध पायी चालत जाऊन श्री नरेश्वर देवाचे दर्शन घेताना दिसत होते, रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी दर्शन घेतले, निसर्गरम्य, झाडे झुडपे, हिरवळ यांनी नटलेल्या, टेकडीवरील मंदिराचे नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद भाविक भक्त लुटत आहेत,