सुनील भंडारे पाटील
सणसवाडी तालुका शिरूर येथे श्रावणी सोमवार निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 47 बाटल्या रक्त संकलन झाले,
सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर बागेत निसर्गरम्य वातावरणात रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला, शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता भाभी पवार यांच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान हे श्रेष्ठदान असून श्रावण महिन्यामध्ये श्री नरेश्वर मंदिरामध्ये सोमवारी तर खूपच गर्दी असते, लोकांनी स्वैच्छेने येऊन रक्तदान केले, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्ष, सणसवाडीच्या माजी सरपंच सुनंदाताई नवनाथ दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दत्ताभाऊ हरगुडे, गोरख भुजबळ, गोरख दरेकर,व सणसवाडीचे ग्रामस्थ यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, अक्षय ब्लड बँक हडपसर पुणे यांनी रक्त संकलनाचे काम केले,