सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला बचत गटांतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
सत्यमेव जयते बचत गट तसेच गावांमधील इतर अकरा बचत गट एकत्र येऊन, बचत गटातील महिला देशभक्ती गीत, ध्वजफडकून समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली,सारे जहासे अच्छा, राष्ट्रगीत वंदे मातरम, ध्वजगीत, तसेच महाराष्ट्रातील श्रावण महिन्यातील पारंपारिक सण, साजरे करत, फुकड्या भोंडला, तसेच बेलाची झाडे लावून, बेलाची झाडे वाटप करण्यात आली महाराष्ट्रीयन पारंपारिक खेळ खेळताना महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. महिलांना देशभक्ती गीत म्हणताना शाळेतील दिवस आठवत होते, वंदे मातरम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या आणि 13 14 15 ऑगस्ट 2022 ला गावामध्ये ध्वजारोहण करून, घरोघरी जनजागृती केली, यावेळी वंदना गव्हाणे (ग्रामपंचायत सदस्य), बचत गट अध्यक्ष, धनश्री कुलकर्णी सचिव, कांचन गव्हाणे, सुजाता काशीद , स्वाती गव्हाणे, हेमलता भांडवलकर , प्राजक्ता राऊत , सुजाता शिंदे, व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या अशी माहिती कोरेगाव भिमाच्या ग्रामपंचायत सदस्य वंदना विजयराव गव्हाणे यांनी दिली,