न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे प्रस्थान

Bharari News
0
न्हावरा प्रतिनिधी सुजित मैड
       न्हावरे (ता. शिरूर) येथील श्रावण महीन्यातील शेवटचा सोमवार निमित्त श्री मल्लिकार्जुन महाराज कावड सोहळ्याचे ढोल ताशाच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषात माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर कडे प्रस्थान झाले  
सकाळी न्हावरे येथील ग्रामदैवत श्री मलिकार्जुन मंदिरात श्रींचा महाभिषेक पार पडला त्यानंतर श्री मल्लिकार्जुन कावड मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली या प्रसंगी परिसरातील भक्तजन या कावड सोहळ्यासाठी उपस्थित होते. शेतकरी नोकरदारवर्ग व व्यापारी बांधवांची कावडला खांदा देण्यासाठी झुंबड उडाली होती परिसरातील भाविकांनी श्री मल्लिकार्जुन महाराज मंदीरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!