लोणी काळभोर अनिकेत मुळीक
दिनांक १९.०८.२०२२ रोजी दहीहंडी उत्सव पुणे शहरात ठिकठिकाणी मोठया उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी १७.०० वा. पासून दहीहंडी फुटे पर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौ, मंडई चौक (बाबु गेणु चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इ. ठिकाणी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते.
त्यावेळी सदर रस्त्यांवर कोठेही वाहतूकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, सदर ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने इष्ट आहे, त्याअर्थी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/सीआर-३७/टिआरए-२,दिनांक-२७/०९/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५,११६(१) (ए) (बी),११६(४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन , राहुल श्रीरामे, पोलीस उप आयुक्त, वाहतुक पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन आवश्यकते नुसार व तेथील वाहतुकीच्या परिस्थिनुसार वाहतुक व्यवस्थेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात येतील त्याबाबत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.
बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळकरोडने/शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.
२. पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाणा-या वाहन चालकांसाठी पुरम चौकातुन टिळक रोडने - अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी.रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच पुरम चौकातुन सेनादत चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील.
३. स.गो.बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे शिवाजी रोडने जाणारे वाहन चालकांसाठी स.गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने - झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जातील. ४. बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येवुन आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील. ५. रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असुन पर्यायी मार्गाचा वापर करावा. ६. सोन्या मारुती चौकाकडुन लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातुन उजवीकडे वळुन फडके हौद चौकातुन इच्छित स्थळी जातील.सदर भागातील वाहतूक परिस्थिती नुसार आवश्यकते प्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. तरी वाहनचालकांनी सायंकाळी १७.०० ते दहीहंडी फुटे पर्यंत उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करुन, वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे.
( राहल श्रीरामे ) पोलीस उप-आयुक्त. वाहतूक,
पुणे शहर . प्रत :-
१.जिल्हा प्रसिध्दी अधिकारी पुणे-१.स्थानिक वृत्तपत्रात बातमी स्वरुपात प्रसिध्दी देणेकामी
२.सहाय्यक पोलीस आयुक्त,परिमंडळ-१, २, ३, वाहतुक शाखा पुणे शहर :
३.सर्व प्रभारी अधिकारी, वाहतुक शाखा पुणे शहर प्रत सादर,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा-१ पुणे शहर