रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कारेगाव (ता. शिरुर) येथील यशइन चौकात बेकायदेशीर रित्या मटका चालवणा-या दोन इसमांवर रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.
या बाबत पोलीस शिपाई उमेश महादेव कुतवळ यांनी फिर्याद दिली. सदर गुन्ह्यात अमोल रामदास नवले वय २६ वर्षे , रवींद्र भगवान मोरे वय ४४ वर्षे दोन्ही राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपी हे कल्याण मुंबई हा मटका कारेगाव गाव येशील यशइन चौकात गायत्री हॉस्पिटलच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये चालवत होते सदर कारवाईत त्यांच्या कडून ५७०५/- रु किमतीचे चे मटक्याचे साहित्य व रोख रक्कम मिळून आली आहे. सदर घटना १८ आँगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.पुढील तपास सहा.फौजदार दत्ताञय शिंदे हे करत आहेत.