शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता शिरूर) चे आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरूर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे कवठे येमाई येथे गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी दत्त चरणी श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले .
यावेळी निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, आदर्श सरपंच दामूशेठ घोडे,पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे,चेअरमन बन्सीशेठ घोडे, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात, कवठे येमाई चे सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर, माजी सरपंच बबनराव पोकळे, मिठुकाका बाफना, ह. भ. प. कर्डिले महाराज, माजी उपसरपंच कानिफनाथ हिलाळ, बाजीराव उघडे, ग्रामपंचायत सदस्य पांडाशेठ भोर, बळशिराम मुंजाळ, चंद्रकांत इचके, निलेश पोकळे, रंगनाथ भोर, फक्कड सांडभोर, सावकार शेठ इचके, रामभाऊ पवार,बाबुराव रोहिले, अशोक गावडे, सिनु शेठ रोहिले, डॉक्टर रमेश पोकळे, जयसिंग इचके, गणेश रत्नपारखी, अरुण हिलाळ, रमेश खाडे, सुखदेव दिवेकर, बबुशा रोहिले, खंडू गावडे,भाऊसाहेब पोकळे, रोहिदास हिलाळ, भाऊ बजाबा रोहिले, नवनाथ रोहिले, बाळू पोकळे, शहाजी रोहिले, माऊली पंचरास , तसेच टाकळी हाजी चे सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, भरत खामकर, बाळासाहेब जाधव, दत्ता दिवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष घोडे, अशोक मेचे,म्हतारबा खाडे, नारायण कांदळकर, भाऊ उचाळे, सावकार घोडे, अमोल रसाळ, मारुती नरवडे, गणेश भोसले, सुरेश बारहाते,शेखर घोडे, बाबाजी उचाळे, गणेश घोडे, बाबाजी सोदक, पुरुषोत्तम चोरे, कांताराम चोरे, दत्ता साळवे,विक्रम घोडे, बाळासाहेब खटाटे, बाळासाहेब टेमकर, संजय निकम व कवठे येमाई गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराची सुरुवात मंगळवारी मलठण येथून झाली असून बुधवारी जांबुत येथेही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
पंचशील फाऊंडेशन चे डॉक्टर ऋषी कवडे,जाफर शेख, शुभम घोडे,शुभम खटाटे,निखिल देवकर, किशोर कवडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.याबद्दल कवठे येमाई ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सदर शिबिर मंगळवार दिनांक २०/०९/२०२२ ते शनिवार दिनांक २४/०९/२०२२ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० या वेळेत मलठण,जांबुत, कवठे येमाई,पिंपरखेड, टाकळी हाजी या गावांमध्ये राबविले जात आहे असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष घोडे यांनी सांगितले.
सदर शिबिरात मोफत ....
* डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप
* बी पी व शुगर तपासणी
* डोकेदुखी,अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला,त्वचेचे
आजार,पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व
आजारांवर मोफत औषधे वाटप
* डोळ्यांसाठी नंबर लागल्यास एक हजार रुपयांचा चष्मा फक्त १५०ते २०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खराब हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे , यामुळे 'एक पाऊल आरोग्याकडे' म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे दामू आण्णा घोडे यांनी सांगितले.