शिरूरला तालुक्यातील २०५०७ प्रकरणे मार्गी
सेवा पंधरावड्यात समस्याग्रस्थ शेतकऱ्यांनी आपली प्रकरणे निकालात काढून घ्यावीत असे आवाहन
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
शिरूर येथील नगरपरीषदेच्या मंगल कार्यालयात दि २१ रोजी २०५०७ प्रकरणे मार्गी लावल्याचे तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी सांगतले दि. २ ऑक्टोबरपर्यंत नागरीकांनी आपापल्या समस्या अडचणींचा निपटारा करून घ्यावा असे आवाहन केले आहे . यावेळी प्रांताधीकारी संतोष देशमुख , तहसिलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी, शिक्रापुरचे पी आय आतकरी व सर्व शासकीय विभागाचे पदाधिकारी ऊपस्थीत होते .
नैसर्गीक आपत्ती धनादेशांचे प्राती निधीक ७० जनांना वाटप केले असून एकूण १ कोटी ४३ लाख मंजूर आहेत . या महासेवा दिनी तहसिल तर्फे फेरफार नोंदी ' राशन आधारकार्ड उत्पन्न दाखले, महावितरणतर्फे विद्युत जोडणी, कृषी पशुसंवर्धन , आपले सरकार पोर्टल , गामविकास, पोलीस , आरोग्य ' वनविभाग आदी शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांत प्रलंबीत अडचनी सोडवनेचा हेतू या सेवा पंधरावड्याचा असून नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करणेत येत आहे.