शिरूर विशेष प्रतिनिधी
दि.१५ रोजी रात्री १०.३० वा . शिरूर मुंबईबाजार येथुन चालत असलेले अभिषेक ईश्वर गंगावणे वय २२ वर्षे रा . मुंबईबाजार शिरूर ता . शिरूर जि . पुणे यांना सहा सिटर रिक्षा मधुन तलवारी , कोयता लोंखडी रॉड लाकडी दांडके यांचा धाक दाखवत दमदाटी करून १० लाख रूपयाची खंडणी मागितली व मारहाण केली,
बळजबरी रिक्षा मध्ये बसवुन अपहरण करून अभिषेक गंगावणे यांना शिरूर येथील दशक्रिया घाट येथे नेउन १ ) विशाल काळे २ ) उमेश जगदाळे , ३ ) अविष्कार लांडे ४ ) अक्षय परदेशी ५ ) कैलास ननवरे ६ ) देवानंद चव्हाण ७ ) हर्षल काळे ८ ) रूपेश लुनिया ९ ) अमोल लुनिया १० ) दादा खिलारी सर्व रा . शिरूर व दोन अनोळखी यांनी त्यांचे गँगसाठी १० लाख रूपयाची खडणी मागुन दहशत निर्माण करून तलवारी , कोयता , लोंखडी रॉड , लाकडी दांडके व हॉकीस्टीक यांनी अभिषेक ईश्वर गंगावणे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले आहे . त्यांनतर ११ ) गोपाळ यादव रा . शिरूर याने अभिषेक गंगावणे यांना फोन करून तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली . त्याबाबत अभिषेक ईश्वर गंगावणे वय २२ वर्षे रा . मुंबईबाजार शिरूर ता . शिरूर जि . पुणे यांनी फिर्यादी दिली आहे, त्या वरून शिरूर पोलीस ठाणे खंडणी मागणे, धमकी देणे . हत्यार बाळगणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयाचा तपास पोसई विक्रम जाधव करीत आहेत . सदर गुन्हयातील आरोपी नामे १ ) अविष्कार संभाजी लांडे वय २२ वर्षे रा . सोनारआळी , शिरूर ता . शिरूर जि . पुणे २ ) अक्षय महेंद्रसिंग परदेशी वय २३ वर्षे रा . काचेआळी , शिरूर ता . शिरूर जि . पुणे ३ ) कैलास लक्ष्मण ननवरे वय २३ वर्षे रा . रामलींग ता . शिरूर जि . पुणे ४ ) हर्षल मनोहर काळे वय २२ वर्षे रा . ढोरआळी , शिरूर ता . शिरूर जि . पुणे ५ ) अमोल हेमंत लुनिया वय २७ वर्षे रा . रामलींग रोड , शिरूर ता . शिरूर जि . पुणे ६ ) अमोल उर्फ दादा अंकुश खिलारे वय २५ वर्षे रा . लाटेआळी , शिरूर यांचा शोध घेउन त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली असुन त्यांना ता . २० / ० ९ / २२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे . उर्वरीत आरोपीत यांचा शोध घेणेकामी शिरूर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहेत . सदर गुन्हयातील आरोपीत पैकी काही आरोपीत हे खुनाच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेले असुन त्या आरोपीतांनी वरील प्रमाणे टोळी करून शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करून लोंकाना खंडणीची मागणी करीत असल्याची गोपनिय माहीती मिळत आहे . याच प्रमाणे वरील आरोपीत यांनी ओनखी कोणास खंडणी मागीतली असल्यास किंवा खंडणी उकळली असल्यास त्याबाबत शिरूर पोलीस ठाणे येथे तकार दयावी . त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल . ही कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सो , मा . अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे सेप , पुणे व मा . उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी सो , शिरूर यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , शिरूर पोलीस ठाणे , पोसई एकनाथ पाटील , पोसई अभिजीत पवार , पोसई विक्रम जाधव , सहा . फौजदार नजीम पठाण , सहा . फौजदार गणेश देशमाने , पोना / २५ नाथा जगताप , पोना / २३३६ बाळु भवर , पो . अंगलदार / १३७८ राजेंद्र गोपाळे , पोअ / १८५० विनोद काळे , पो . अं . / २ ९ २४ संतोष सांळुखे पो.अं. / १२ ९ प्रविण पिठले , पाअं . / २५६८ सचिन भोई या टिमने केलेली आहे .