सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
सणसवाडी (ता . शिरूर) येथे रात्री अज्ञात वाहनाने जोराची धडक देवून गेल्याने तरुणाचा मृत्यु झाला असून मृताच्या तोंड डोके पोटावरील जबर गंभीर जखमामुळे आलेली खुनाची शंका फोल ठरली आहे .
शिक्रापुर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनचालका विरुद मृताचे मामा विठ्ठल जगन पवार रा . वाघोली, पुणे, यांनी माहीती दिल्या नुसार कृष्णा राठोड वय २६ रा . लखमापुरतांडा ता. माहूर जि . नांदेड हा सणसवाडी औद्योगिक परीसरात हंगामी मिळेल ते काम करण्यासाठी आला होता .
या अपघाताचा पोलीस पंचनामा केला असून वाहनाच्या धडकेने मृत राठोड शंभर फुटावर डिव्हाडरमध्ये पडला होता . गाडीने जोराने ब्रक मारल्याच्या खुना व शेजारी माजी उपसरपंच सागर दरेकर यांचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात रात्री अडीचचे दरम्यान एक गाडी व्हायबल झाल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले . खुनाच्या वार्तेने खळबळ उडाली होती . मृतदेह उतरीय तपासणीसाठी ससून हॉस्पीटलला नेले असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्ग दर्शना खाली फौजदार खटावकर सहायक फौजदार मळेकर ' चौधरी आदी अपघाताचा अधिक तपास करत आहेत.