गुनाट प्रतिनिधि एकनाथ थोरात
गुनाट( ता.शिरूर) :- येथील परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा उपद्रव वाढला आहे बिबट्याच्या उच्छादामुळे व शिरूर तालुक्यातील गुनाट, शिंदोडी, निमोणे या परिसरातील घडलेल्या घटनांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे,
बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची कामे करणे मुश्किल होऊन बसले आहे एकटी महिला किंवा पुरुष शेतामध्ये काम करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्यातच आता बिबट्या घराजवळील जनावरांवर हल्ला करू लागला आहे गुनाट येथील शेतकरी श्रीकांत मारुती चौधरी हे रोजच्या प्रमाणे आपल्या घरासमोर शेळ्या बांधून आपल्या कामानिमित्त बाहेर गेले असता रविवार (दि ११) रोजी सायं ७:३५ च्या सुमारास बिबट्याने दोन शेळ्या वर हल्ला करून ठार मारले ही घटना शेतकरी श्रीकांत मारुती चौधरी यांच्या आई शोभा मारुती चौधरी या महिलेने पाहिले. ही घटना झाल्यामुळे तसेच जवळपास कोणाचेही घर नसल्यामुळे बिबट्याच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना श्रीकांत चौधरी यांनी तत्काळ माजी सरपंच गणेश कोळपे, उपसरपंच पांडुरंग गव्हाणे यांना सांगुन घटनेची सविस्तर माहिती वनसेवक नवनाथ गांधले यांना सांगितली. वनसेवक यांनी (दि.१२) रोजी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. या पंचनामा दरम्यान बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच गणेश कोळपे, उपसरपंच पांडुरंग गव्हाणे, राजेंद्र करपे यांनी केली तसेच बिबट्याला पकडण्यासाठी गुनाट परिसरात दोन ते तीन पिंजरे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी गुनाट ग्रामस्थानी केली आहे सदर गुनाट, निमोणे, शिंदोडी परिसरात भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.