शिक्रापूर प्रतिनिधी प्रा.एन.बी.मुल्ला
अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्रा.एन.बी.मुल्ला यांनी केले.
कासारी (ता.शिरुर) येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रा.एन.बी.मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अशोक सरोदे होते. यावेळी बोलताना प्रा.एन.बी. मुल्ला पुढे म्हणाले की उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विवीध प्रकारचे मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसीक विकासासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याचेही याप्रसंगी बोलताना प्रा.मुल्ला यांनी सांगितले. या कार्यक्रमात लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, पोत्यातील उड्या, तिपायी शर्यत, वक्तृत्व स्पर्धा, स्लो सायकलिंग, नृत्य, रस्सीखेच, हॉलीबॉल आदी स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ अध्यापिका नसीमा काझी, राजाराम साबळे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, ज्योत्स्ना दरेकर, शिवाजी पाखरे, विशाल सोनवणे, अर्चना टेमगिरे, दिलिप बांबळे, प्रा.शितल धेंडे, प्रा.विजय पाचर्णे, प्रा.नजमा मकानदार, प्रा.अजिंक्य कडलग, प्रा.गौरव चव्हाण, प्रा.गौरव निकम, प्रा.शीतल चव्हाण, प्रा.म्हेत्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.