टाकळीहाजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी 
             टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी - कोयंडे उचकटून चोरटयांनी चोरी केली आहे. 
सोमवारी (दि.१९)  रात्री ०९.३० वाजण्याचे सुमारास प्रभाकर गावडे व त्यांचा मुलगा वेदातं असे जेवण करून टाकळी हाजी गावातील घर बंद करून झोपणेसाठी शेतातील दुसऱ्या घरी गेले होते. त्यांनंतर मंगळवारी( दि.२०)  सकाळी ०६.३० वा. चे सुमारास  शेजारी राहणाऱ्या सुप्रिया अमोल गावडे यांनी फोनवरून प्रभाकर गावडे यांना तुमचे घर उघडे दिसत आहे कोणीतरी दरवाजाचा कोंडा तोडलेला दिसत आहे अशी माहीती मिळाल्याने ते घरी गेल्यावर घराचे कोंडा तुटुन कोंडयांसहीत कुलुप पडलेले दिसले. लोकं जमा झालेनंतर घराची पाहणी केली असता घरातील बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे दिसले. तेव्हा कपाटाची पाहणी करता लोंखडी कपाटाचे लॉकर उचकटुन उघडलेले दिसले व त्यातील सोन्याचे दागीने दिसून आले नाही . त्यांनतर घराची पाहणी करीत असताना प्रभाकर गावडे यांचे चुलत भाऊ निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव श्रीपती गावडे यांचे पण घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांना फोन करून घरात चोरी झालेबाबत माहीती देवून त्यांच्या घरात जावुन पाहणी  केली असता त्यांचे घरात उचकपाचक करून कपडे खाली पडलेले दिसले. व महादेव श्रीपती गावडे यांचे घरातील दोन टेबल फॅन प्रभाकर गावडे यांच्या घरात चोरटयाने ठेवलेले दिसले. तेव्हा प्रभाकर गावडे व महादेव गावडे असे  दोघांचे घरात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घूसून  घरातील ५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण २,६५,००० रू चे घरफोडी करून चोरून नेले आहेत अशी फिर्याद प्रभाकर गावडे यांनी पोलिसांत दिली आहे. 
         घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर,  पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे, पोलिस हवा. अनिल आगलावे यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. बेट भागात अनेक दिवसापासून चोऱ्यांचे सत्र सुरु असून आता अधिकाऱ्यांच्या  बंद घरावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.आता पोलिस आधिकाऱ्यांचीच घरे सुरक्षित राहिली नसुन कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!