शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरूर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे कवठे येमाई येथे शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी हनुमान चरणी श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले .
यावेळी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे,चेअरमन बन्सीशेठ घोडे,पिंपरखेड गावचे माजी सरपंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिवाजी बोंबे, सरपंच राजेंद्र दाभाडे,उपसरपंच विकास वरे, दामू दाभाडे , शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे, मेजर बळवंत बोंबे, दिलीप बोंबे, नानाभाऊ गावशेते, सचिन बोंबे,अशोक ढोमे, जयवंत बोंबे, दिगंबर सोनवणे, बाळासाहेब बोंबे, दिपक बोऱ्हाडे, शरद बोंबे , संतोष वरे , ज्ञानेश्वर टाकळकर, तुकाराम नरवडे, रामदास गावडे तसेच पिंपरखेड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या व टाकळी हाजी च्या सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, बाळासाहेब जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष घोडे, अशोक मेचे,म्हतारबा खाडे, नारायण कांदळकर, भाऊ उचाळे, सावकार घोडे, अमोल रसाळ, मारुती नरवडे, गणेश भोसले, सुरेश बारहाते,शेखर घोडे, बाबाजी उचाळे, गणेश घोडे, बाबाजी सोदक, पुरुषोत्तम चोरे, कांताराम चोरे, दत्ता साळवे,विक्रम घोडे, बाळासाहेब खटाटे, बाळासाहेब टेमकर, संजय निकम, गणेश कसबे, रामदास खटाटे व पिंपरखेड गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराची सुरुवात मंगळवारी मलठण येथून झाली असून बुधवारी जांबुत,गुरुवारी कवठे येमाई येथेही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.पंचशील फाऊंडेशन चे डॉक्टर शुभम घोडे, ऋषी कवडे,जाफर शेख,शुभम खटाटे,निखिल देवकर, किशोर कवडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.याबद्दल पिंपरखेड ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सदर शिबिर मंगळवार दिनांक २०/०९/२०२२ ते शनिवार दिनांक २४/०९/२०२२ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० या वेळेत मलठण,जांबुत, कवठे येमाई,पिंपरखेड, टाकळी हाजी या गावांमध्ये राबविले जात आहे असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष घोडे यांनी सांगितले.
सदर शिबिरात मोफत ....
* डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप
* बी पी व शुगर तपासणी
* डोकेदुखी,अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला,त्वचेचे
आजार,पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व
आजारांवर मोफत औषधे वाटप
* डोळ्यांसाठी नंबर लागल्यास एक हजार रुपयांचा चष्मा फक्त १५०ते २०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खराब हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे , यामुळे 'एक पाऊल आरोग्याकडे' म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे दामू आण्णा घोडे यांनी सांगितले.