सुनील भंडारे पाटील
पुणे एसीबी ची धडाकेबाज कामगिरी, चाकण (तालुका खेड) येथे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या मोटरसायकलवर कारवाई न करण्यासाठी 10 हजारांची लाच मागून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका वॉर्डन सह पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले,
वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय 32) आणि वॉर्डन किशोर भगवान चौगुले (वय 43) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत, याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची मोटरसायकल चाकण मधील वाहतूक विभागाने ताब्यात घेतली होती, परंतु कारवाई न करता परत देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल जायभाय यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदाराने एसीबीसी संपर्क साधला त्यानंतर मंगळवारी त्याची पडताळणी करण्यात आली, त्यानंतर जायभाय याने 7 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली, त्याला वॉर्डन किशोर चौगुले यानी साथ दिली, लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने सापळा रचून एक पथक तयार केले, आणि तक्रारदाराकडून 7 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले, एसीबीच्या या कार्यवाहीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे,
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शितल घोंगरे, पोलीस अंमलदार रियाज शेख, सौरभ महाशब्दे, चंद्रकांत कदम या पथकाने केली,