कोरेगांव भिमा नं. 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटी तर्फे 15% लाभांश

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
         कोरेगांव भिमा (तालुका शिरूर) येथील नं. 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटी तर्फे 15% लाभांश संस्थेची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बबुशा आनंदराव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.  
बाजार चौकातील हनुमान मंदिर मध्ये जेष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. संस्थेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. सन 2021/22 अखेरील आर्थिक हिशोबपत्रके, ताळेबंद,अंदाजपत्रक, अक्रियाशील सभासदांचे सभासदत्वा बाबत विचारविनिमय करून मान्यता देण्यात आली. संस्थेची कर्जवसुली चांगली असल्यामुळें संस्थेला 14.86 लाख एकुण नफा झाल्याने निधींची गुंतवणूक करून सभासदांना 15 %टक्के लाभांश देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.अशी माहिती सचिव मधुकर कंद यांनी दिली 
       महाराष्ट्र शासनामार्फत वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/ रुपये प्रोत्साहनपर लाभ, व्याज सवलत, संगणकीकरण, खत विक्री विभाग सुरु करणे इत्यादि विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. संस्थेचे वयोवृध्द ज्येष्ठ मा. संचालक दगडू अंकूश गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचीत तज्ञ संचालक सर्जेराव दाजिबा गव्हाणे व नितिन ज्ञानेश्र्वर गव्हाणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण फडतरे, माजी उपसरपंच  राजाराम ढेरंगे, घोडगंगाचे माजी संचालक विक्रमराव गव्हाणे पाटील, कैलास सोनवणे, वसंत गिलबिले,  विक्रम दौंडकर, यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष,बबुशा ढेरंगे व उपाध्यक्ष सारिका गव्हाणे यांनी आभार मानले.यावेळी सर्व संचालक व कोरेगांव भिमा, डिंग्रजवाडी,वाडा पुनर्वसन येथील
अनेक शेतकरी सभासद उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 23, June 2025