सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
जेजुरी (तालुका पुरंदर) येथे संपन्न झालेल्या ३री खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत चॅम्पियन मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकॅडमी, पुणे महाराष्ट्र यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत राज्यातील ३३ संघ सहभागी झाले होते. चम्पियन मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे ७७ खेळाडू सहभागी असून त्यात सर्व खेळाडूंनी क्रमांक पटकवला यात ३५ खेळाडूंनी गोल्ड मेडल, २० खेळाडूंनी सिल्वर मेडल, व २२ खेळाडूंनी ब्राँझ मेडल मिळवले आहे. पुरंदर तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते अकॅडमीला प्रथम पारितोषिक देण्यात आले. तसेच मा. सनदी अधिकारी संभाजी झेंडे, स्व. एकनाथकाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका जगताप, पुणे महानगर पालिकेचे कार्यक्षम नगरसेवक योगेशबापू ससाणे, पुणे महानगर पालिकेचे स्वीकृत नगरसेवक अविनाशतात्या काळे, मार्गदर्शक वरिष्ठ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र. ४४ हडपसर गणेश बोराटे इ. मान्यवरांनी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देऊन खेळाडूंचे व प्रशिक्षकांची अभिनंदन केले. हे सर्व खेळाडू शिहान -प्रदीप वाघोले, सेन्साई- तेजस वाघोले, सेन्साई - ललित वाघोले, आकाश कुदळे, सविता देवडे, श्वेता फडतरे व पूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.