विजयस्तंभ नगर झोपडपट्टी घरांची 8 अ दप्तरी नोंद होण्यासाठी लाक्षणिक सामूहिक उपोषण

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
           पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील विजयस्तंभ नगर झोपडपट्टी मधील अनेक वर्ष राहत असलेल्या रहिवाशांच्या घरांची व पत्रा शेडची ग्रामपंचायत 8 अ ला सरकारी दप्तरी नोंद व्हावी या अनेक वर्षांच्या मागणीसाठी रहिवाशांनी शुक्रवार दिनांक 7/10/2022 रोजी सामूहिक लाक्षणिक उपोषण पुकारले आहे,   
या सामूहिक लाक्षणिक उपोषणाचे लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, पेरणे फाटा पुणे नगर महामार्ग लगतच्या शेजारी असलेल्या विजयस्तंभ नगर या झोपडपट्टीत राहणारे रहिवाशी शासनाच्या अनेक सोयी सुविधा पासून वंचित आहेत, त्यांची घरांची सरकारी दप्तरी नोंद देखील नाही, विजय स्तंभ नगर रहिवाशी गट नंबर 1032 येथे 30 ते 40 वर्षांपासून राहण्यास असून हा गट खानपड म्हणून जिल्हाधिकारी पुणे यांच्या नावे 7/12 आहे,     
असंख्य लोकसंख्या राहत असलेल्या या वस्तीत घरामध्ये अनेक गैरसोयी आहेत, शासकीय वीज, पाणीपुरवठा, निवारा तसेच स्मशानभूमी, आरोग्य सुविधा यापासून ही वस्ती वंचित आहे, याबाबतीत ग्रामपंचायत व वरिष्ठ कार्यालय यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ८ अ च्या उताऱ्या बाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, तरी विजय स्तंभ नगर मधील रहिवाशांच्या घरांच्या नोंदी तातडीने व्हाव्यात अन्यथा येत्या शुक्रवारी दिनांक 7,10,2022 रोजी, पेरणे फाटा विजयस्तंभ नगर येथे सार्वजनिक लाक्षणिक उपोषणाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे,     
सार्वजनिक लाक्षणिक उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार हवेली पुणे, आमदार शिरूर हवेली, पोलीस स्टेशन लोणीकंद, ग्रामपंचायत पेरणे, प्रिंट व सोशल मीडिया, यांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!