सणसवाडी - ज्ञानेश्वर मिडगुले .
सणसवाडी (ता शिरूर) येथील हायवेलगतचे भैरवनाथ मंदिरालगतचे आखील सणसवाडी नवरात्रोत्सव मंडळा तर्फे यावर्षीही वेगवेगळे उपक्रम राबवले असून महिलांचे साठी खेळ पैठणीचा या स्पर्धेत शेकडो महिलांनी भाग घेतला .
वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेत विजेत्याना एक पैठणी , १२ साड्या, ५ प्रेशर कुकर, ५ मिक्सर , ५ गॅस शेगड्या अशी मोठ्या प्रमाणात बक्षीसे मान्यवरांचे हस्ते वाटप करणेत आली . ३० वर्षापासून मंडळाने रुग्णवाहिका, शालेय विदयार्थ्यांना बक्षीसे , शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी केलेल्या शिक्षकांचा संम्मान , वंचित घटकांना मदत , हायवेला अपघातग्रस्ताना सहाय्य असे समाजोपयोगी उपक्रम राबवले असून अलिकडे आर्केस्ट्राचे फॅडही पोसले आहे .
संस्थापक माजी सरपंच दत्ता हरगुडे, शिरूर ता. काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव , माजी उपसरपंच शिवाजी दरेकर , नवनाथ हरगुडे , सोसायटीचे चेअरमन कैलास दरेकर , महादेव हरगुडे,सागर हरगुडे, ऋतुराज हरगुडे, सर्पमित्र बाळासो मोरे आदी कार्यकर्ते उपक्तमांत सहभागी असतात . या मंडळाचे आरतीस आ . अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे व सर्वपक्षीय पदाधीकारी व शासकीय अधीकारी हजेरी लावली . सुत्रसंचलन माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, बाळासो मोरे यांनी केले .