प्रतिनिधी गावडेवाडी मिलिंद टेमकर
मंचर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांकडून पारधी समाजातील लोकवस्तीतील लोकांना दिवाळी फराळाचे वाटप, सध्या दिवाळी सणांची सर्वत्र गडबड सुरू आहे. सर्वजन आपआपले कुटुंबाससमवेत दिवाळी सण साजरा करण्यामध्ये व्यस्त आहे. अशामध्येच समाजापासुन वर्शानुवर्शे वंचित राहलेला घटक म्हणजे पारधी समाज जो की, कधी कोणत्याही समाजामध्ये मिसळत नाही. एकटे कुटुंब गरीबी आणि हाल अपेष्टा झेलत मोलमजुरी आणि भिक मागुन आणि मिळेल ते खावुन स्वतःचे कुटुंबाची गुजरान करीत असतात. यांना दिवाळी काय आणि दसरा काय ....कोणताच सण माहीती नसतो. अशातच जनतेच सेवक म्हणुन काम करीत असताना मंचर पोलीस स्टेशनचे सन्मानीय पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांचे अनोखे प्रेरणेमधुन आणि पारधी समाजाचे प्रखर नेतृत्व करणारे कवी, लेखक श्री. नामदेव भोसले यांचे संकल्पनेतुन मंचर पोलीस स्टेशन हददीत राहणारे पारधी समाजाचे गरीब कुटुंबियांना दिवाळी सणाचे फराळ वाटप करून एक अनोखी दिवाळी भेट दिलेली आहे.
या प्रसंगी मंचर अण्णासाहेब आवटे काॅलेजचे पाठीमागे राहणारे पारधी वस्तीवर मंचर पोलीसांनी अचानक भेट दिली त्यावेळी पोलीसांची गाडी आल्याचे पाहुन सर्वजन गांगरून गेले आणि पळापळ चालु केली त्यावेळी मंचर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सोमषेखर षेटे, पोलीस नाईक सोमनाथ वाफगांवकर, राजेश तांबे आणि अजित पवार यांनी तेथील मुलांना जवळ घेत आधार दिला आणि त्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला पकडायला आलो नसुन आम्ही तुम्हाला दिवाळीचा खाऊ घेवुन आलो आहे. त्यावेळी त्यांचे व आई वडीलाचे चेह-यावर एक प्रकारचे गोंडस स्मित हास्य फुलुन आले. ते हास्य आणि ते समाधान बाजारात कोणत्याही पैशाने विकत घेता येणार नाही. त्यानंतर सर्वांना एकत्रीत रित्या दिवळीचा फराळ वाटप करून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांचे मुलांना आणि आई वडीलांना आपली मुले समाजात शिक्षण घेवुन कशी मोठी होतील याचे महत्व पटवुन देण्यात आले. पोलीस बांधव समाजात काम करीत असताना त्यांचेमधुन एक प्रकारचे माणुसकीचे दर्शन देखील या माध्यमातुन पहावयास मिळते. त्यातच मंचर पोलीस स्टेशनमधील देव माणुस म्हणजे श्री. सतीष होडगर पोलीस निरीक्षक हे नेहमीच समाजातील आपले पोलीस बांधव आणि त्यांचे कुटुंबांबरोबरच समाजातील लहान थोर, गरीब जनतेबरोबर सण उत्सव साजरा करीत असताना दिसुन येतात. अशा या कर्तृत्तवान खाकीला मानाचा मुजरा.