शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
युवकांनी सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक वाचन करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.ललित इंगवले यांनी केले.
जातेगाव बुद्रुक (ता.शिरुर) येथील गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या जिजामाता महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललित इंगवले बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ व उत्तम शिक्षक होते. युवकांनी अशा आदर्श व्यक्तिमत्वाचे अनुकरण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी मार्गक्रमण करावे असे आवाहनही त्यांनी केले. युवकांनी नवीन दिशा शास्त्रीय संशोधन यावर लक्ष द्यावे व संशोधनात्मक विचार करावा असेही याप्रसंगी बोलताना डॉ. इंगवले यांनी केले. तसेच संभाजीराजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व यावर सविस्तर माहिती सांगितली. महाविद्यालयात सर्व ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा व पुस्तक वाचन यावर भर दिला. या कार्यक्रमास ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश टाकळकर, समन्वयक गजानन पाठक, कार्यालय अधीक्षक आनंदा अंकुश आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रीती पवार, डॉ. विजय गायकवाड, प्रा.योगिता इंगळे, प्रा. सरोज मुळे, प्रा.पुजा काटे, प्रा. रोहिणी जराड, प्रा.सीमा बांगर, प्रा. अमोल धापटे, प्रा.अश्विनी खेडकर, प्रा.सारिका जेधे, प्रा.अशोक शिंदे, आकाश शितोळे, दादा भागवत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजय गायकवाड यांनी केले तर प्रा.योगिता इंगळे यांनी आभार मानले.