बिरुशेठ खोमणे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनता सहकारी बँकेचे माजी संचालक बिरुशेठ खोमणे यांना राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   
आम्ही पुणेकर रहिवासी मित्र परिवार स्नेहमेळाव्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सारीकाताई भरणे, पुणे जि.प. सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे मनपा शिक्षण मंडळ माजी सदस्य लक्ष्मीकांत खाबीया, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, सेवानिवृत्त उपायुक्त पुणे मनपा हनुमंत नाझीरकर, एलआयसी विकास अधिकारी संभाजी गाडे, पोलीस उपनिरिक्षक प्रताप साळवे, शिरूरच्या नगराध्यक्षा मनिषाताई गावडे, अँड वसुमती गावडे, अश्विनीताई खर्से, रभाजी खोमणे, शहाजी पवार, डॉ भानुदास कुलाळ, रमेश गुगळे, शिवाजी गावडे, अर्जुन पिंगट, राजेंद्र शिनारे, सचिन हिलाळ, सौरभ शेगर, मल्हारी पवार, मारुती नरसाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे व अहमदनगर जिल्हयाच्या ग्रामीण भागातील नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने स्थायीक झालेले विविध क्षेत्रातील अनेक कुटुंब सहपरिवार उपस्थित होते.
सिंहगड रोड पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात जनता बँकेचे माजी संचालक बिरूशेठ खोमणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रूग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व आरोग्यसेविका यांना "कोरोना योध्दा" पुरस्कार देवून आमदार दत्तात्रय भरणे व उपजिल्हाधिकारी श्री रामदास जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी केले. सोमनाथ उचाळे यांनी सुत्रसंचालन केले तर एलआयसी विकास अधिकारी संजय भाईक यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!