शिरूर बाजार समितीचे काम उल्लेखनीय– माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Bharari News
0
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
       शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीने कांदा सेलहॉल, ८० टनी वजनकाटा व प्रशासकीय इमारत पायाभरणी कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभहस्ते व शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोकबापू पवार यांचे अध्यक्षतेखाली आज शिरूर मार्केट यार्डमध्ये पार पडला.     
याप्रसंगी मा.दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आपले भाषणामध्ये राजकीय उहापोह करताना बाजार समितीमध्ये सध्याचे संचालक मंडळाचे कालावधीत उल्लेखनीय काम झालेले असुन तोट्यात असणाऱ्या बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करून नफ्यात आणण्याचे काम केलेबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
   कार्यक्रमासाठी माजी आमदार पोपटरावजी गावडे, सुर्यकांतकाका पलांडे, पुणे जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, मानसिंग  पाचुंदकर बाजार समिती संचालक व अध्यक्ष आंबेगांव विधानसभा राष्ट्रवादी कॉग्रेस, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, माजी उपसभापती सविताताई पऱ्हाड, बाजार समितीचे माजी संचालक वाल्मीकराव नागवडे, गौतम कदम, सिद्धार्थ कदम, महादेव जाधव, संतोष भंडारी, बच्चुपाटील जाधव, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल होळकर, सुदामतात्या साठे, अर्जुननाना कोंडे,  आलेगांव पागाचे सरपंच आप्पासाहेब बेनके, टाकळी हाजीचे सरपंच दामुशेठ घोडे, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाअण्णा पवार, प्रगतशिल शेतकरी सोपानराव भाकरे, सुरेश पाचर्णे, जगन्नाथ पाचर्णे, रामलिंगचे माजी सरपंच नामदेव जाधव, माजी सचिव पी.एन.ढोकले, विश्वासराव पवार, अनेक शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व बाजार घटक तसेच बाजार समितीचे सभापती ॲड.वसंतकाका कोरेकर, उपसभापती प्रा.सतिश कोळपे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, शंकरदादा जांभळकर, माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, प्रविण चोरडीया, संचालक विजेंद्र गद्रे, सुदिप गुंदेचा, बंडु जाधव, छायाताई बेनके, मंदाकिनी पवार, सहाय्यक निबंधक शंकर कुंभार, सचिव अनिल ढोकले उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे वेळी बाजार समितीचे मुख्यबाजार व उपबाजार आवारामध्ये ज्या आडतदार, खरेदीदार, शेतकरी यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कांदा विभागात शिरूर मार्केट मधील मच्छिंद्र रोडे, विजय पळसकर,सागर सुर्यवंशी, राजेंद्र गिते, धान्य विभागात तळेगांव ढमढेरे मार्केट मधील मोहन धोंडीबा विरोळे पाटील, शिरूर मार्केट मधील संतोष भंडारी, प्रकाश सुराणा, सुनिल बरमेचा, भाजीपाला-तरकारी विभागात पिंपळे जगताप मार्केटमधील शरद उमाप, दत्तात्रय आनंदराव गावडे आणि कंपनी, हर्षद पिंपळे, पाबळ मार्केट मधील भगवान घोडेकर, निलेश शहाजीराव धुमाळ या आडतदारांचा,  तसेच पिंपळे जगताप मार्केटमधील उत्कृष्ट खरेदीदार रामशेठ किसन गोरे, शिरूर कांदा मार्केटमधील संतोष चोरडीया यांचा सत्कार करणेत आला. त्याचप्रमाणे धान्य विभागात वाघाळे येथील संभाजी ज्ञानदेव शेळके, भाजीपाला तरकारी विभागात खंडाळे येथील चांगदेव शिवाजी नरवडे, व कांदा विभागात नागरगांव येथील संतोष भास्कर शेलार या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतमाल यार्डवर विक्रीसाठी आणलेबद्दल यांचाही सत्कार करणेत आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!