सुनील भंडारे पाटील
मुलांमध्ये जिद्द व महत्वाकांक्षा असेल तरच ती जिवनामध्ये मोठी आणी यशस्वी होऊ शकतात - असे विचार पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी पाटेठाण प्रशालेतील ७वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले . जिवणामध्ये शिकून सवरूनच मोठं होता येते त्या साठी आपलं लक्ष फक्त शिक्षणावर हवे . मुख्याध्यपक आडसूळ यांनी आभार मानले . यानंतर पाटेठाण देवकरवाडी टाकळी सिमेवरील सद्गुरु हंबीर हायस्कूल मध्येही १०वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना रामयनातील सिते प्रमाणे मुलींनी सोनेरी वस्तूचा का कशाचाही मोह धरु नये व जिवनात असलेली धोकादायक लक्ष्मणरेषा ओलांडू नये अन्यथा रामायण घडते असे सोदाहरण सांगीतले . प्राचार्य घेगडे यांनी मिडगुले यांचा सत्कार केला . यावेळी मुलांना ज्ञानयोग सुगंधालयाच्या सौजन्याने हरीपाठांचे वाटपही करणेत आले .