सासवड प्रतिनिधी बाप्पु मुळीक
दारूच्या नशेत तर्राट होवून स्कूल बस चालवणाऱ्या खळद (ता.पुरंदर) येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, शालेय प्रशासना विरोधात गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी,
पुरंदर तालुक्यातील खळद येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हे या नात्या कारणाने नेहमीच वादात राहिलेले आहे. या शाळेच्या कारभाराबाबत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या नेहमीच तक्रारी समोर आल्या आहेत याबाबतीत प्रसार माध्यमांमधून नेहमीच बातम्या प्रसारित झालेले आहे या सोबतच शाळेचा ढिसाळ व्यवस्थापन याबाबतीतही अनेक तक्रारी आहेत शिवाय पालक संघ व शाळेचा वाद न्यायालयात देखील या या संदर्भात खटला सुरू आहे . आज सकाळी याच सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्कूलबस चा ड्रायव्हर दारूच्या नशेत तर्राट होऊन मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे सुसाट वेगाने स्कूल बस चालवत खळद पासून सासवड पर्यंत पोहोचला आणि सासवड शहरातील सोपानदेव मंदिर परिसरा जवळ ही बस मुरमाच्या ढिगार्यात रुतल्याने बंद पडली हा ड्रायव्हर इतका बेधुंदावस्थेत आणि दारूच्या नशेत होता की त्याला या कशाचीही शुद्ध नव्हती,
परंतु यामध्ये शाळा व्यस्थापनाचा बेजबाबदारपणा उघड झाला असुन या शाळेच्या स्कुल बसने प्रवास करणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने या बस मध्ये शाळेची मुले नव्हती अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.शाळा व्यवस्थापन शाळेचे प्रिन्सिपल यांनी स्कूलबस च्या चालकांची पोलीस वेरिफिकेशन सर्टिफिकेट त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली आहेत का त्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे का सदरचालकांना स्कूलबस चालविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे का सकाळी ज्यावेळी हा चालक शाळेमध्ये आला आणि स्कूल बस तो घेऊन जात होता त्यावेळी त्यांनी शाळेच्या हजेरी पत्रकावर सही करत असताना त्यांनी दारू पिलेली आहे का नाही हे बघितलं गेलं होतं का? या स्कूलबस मध्ये मदतनीस होती का? कारण प्रत्येक स्कूल बस मध्ये मदतनीस असणार गरजेचा आहे . यासोबतच शासनाने स्कूल बच्चा घालून दिलेल्या मार्गदर्शक नियम अटी व कायदे यांचं पालन शाळेकडून केलं जात आहे का याची तपासणी होणे ही तितकच गरजेचं आहे कारण स्कूल बसने प्रवास करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवित अशी हा खेळ होतोय या घडलेल्या प्रकारामुळे पालकांमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचा आणि नाराजीचा वातावरण आहे शाळा व्यवस्थापन याबाबतीत खरंच काही सुधारणा करणार आहेत शालेय प्रशासन आपली जबाबदारी झटकून मोकळे होणार आहे का असा देखील सवाल आता उपस्थित केला जातो आहे.
शाळेचा चालक निलेश मधुकर पुमन वय 44 वर्ष राहणार पिंपळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे याची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मादक द्रव्याचे सेवन केले बाबतचा वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणपत्र दिले आहे सदर चालका विरोधात 1988 चे कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु केवळ चालकावरती गुन्हा दाखल करून हा प्रश्न सुटणार आहे का.