शिक्रापूर - न्हावरे रस्त्यावर जीवघेणा खड्डा

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
          शिक्रापूर - न्हावरे (तालुका शिरूर) रस्त्यावर शिक्रापूर ते तळेगाव ढमढेरे दरम्यान मुळोबा ओढ्यावरील पुलावर मधोमध  पावसामुळे मोठा खड्डा पडला असून या धोकादायक खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याची दखल घेऊन हा जीवघेणा खड्डा बुजवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.       
शिक्रापूर - न्हावरे या सुमारे ३० किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे.त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक जलद झाली आहे. परंतु पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.  
त्यामुळे काही ठिकाणी रस्ता खचत आहे. तसेच जोरदार आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडा देखील तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या नवीन रस्त्याची दुरावस्था होत असल्याने संबंधित ठेकेदाराने पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही अशा पद्धतीने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने प्राथमिक स्वरूपात रस्त्याची पाहणी करून तातडीने डागडुजी करणे व साईड पट्ट्या भरणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. या प्राथमिक बाबीकडे प्रशासनाने व संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास चांगल्या रस्त्याची 'वाट' लागण्यास फार दिवस लागणार नाहीत अशा प्रतिक्रिया देखिल कांही नागरिकांनी दिल्या आहेत. 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!