वाघाळेत बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग - ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
       जांबुत (ता. शिरुर) येथील नरभक्षक बिबट्या जेरबंद होतोना होतो तेच वाघाळे  शिवारात वावरत असलेल्या बिबट्याने वाघाळे येथील कारकुड वस्तीवरील दोन तरूण दुचाकी वरुन घरी जात असताना बिबट्या ने पाठलाग केला असल्याची घटना नुकतीच घडली.    
 माञ यातील दुचाकी चालवणा-या  युवकाच्या चपळाई मुळे दोघे ही बिबट्या घ्या हल्ल्यातून बालंबाल बचावले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण बिबट्या आणी आमच्या दुचाकीमध्ये केवळ दोन फुटांचे अंतर राहिले असल्याचे दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या सुदाम कारकुड याने सांगितले.     
वाघाळे तालुका शिरूर येथील शिवारात बिबट्या चे अनेक दिवसांपासून वास्तव्य आहे. शेत शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व रस्त्याने ये जा करत असलेल्या अनेक नागरिकांना या बिबट्या ने दर्शन दिल आहे . याबाबत ग्रामपंचायत प्रशसनाने व स्थानिक काही ग्राम स्थानी वन विभागाकडे बिबट्या चा बंदोबस्त करण्यासाठी पिजरा लावयाची मागणी केली होती.  वनविभागाने या मागणीला दाद देत पिंजरे उपलब्ध करून दिले मात्र काही काळानंतर पुन्हा काढून नेले त्यामुळे येथील शेतकरी बांधवांना जीव मुठीत काम करावे लागत आहे. प्रवास करावा लागत आहे.       
सुदाम कारकुड व परशुराम  कारकुड हे दोन युवक कामावरुन घरच्या दिशेने दुचाकी वरुन जात असताना सोनवणे वस्ती जवळील एका शेतात दबा धरुन बसलेल्या  बिबट्या ने या युवकांच्या दुचाकी च्या दिशेने धाव घेतली असल्याचे परशुराम  कारकुड याच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून वेगात दुचाकी पळवून  बिबट्या च्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.,   
    बैलगाडा शर्यती त वेगवान बैलांसमोर घोडी पळवत असल्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे बिबट्या ला हुल देण्यात यशस्वी झालो असल्याचे परशुराम  कारकुड याने सांगितले., 
दरम्यान वनविभागाने तत्परतेने बिबट्या चा बंदोबस्त केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा वाघाळे ग्रामस्थांनी दिला आहे. तर वाघाळे परिसरात लवकरात-लवकर पिंजरे लावण्यात येतील अशी माहिती वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!