लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर (पुणे ता. हवेली) लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी ता. ८, सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास कदमवाकस्ती हद्दीतील इंधन चोरीच्या अड्डयावर छापा टाकुन, दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केलाआहे,
महिन्या पूर्वीच सामाजिक सुरक्षा विभागाने तरडे हद्दी मधील इंधन चोरी करणाऱ्या जोरदार कारवाई केली असता...पुन्हा इंधन चोरी करण्याचे धाडस येते कुटून असा प्रश्न
जनसामान्य ना पडलेले आहे.पण याचे उत्तर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे (सिंघम) वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण* यांनी कदमवाक वस्ती हद्दीत कारवाई केल्याने, चांगलीच खळबळ उडाली आहे.दरम्यान वरील कारवाईत लोणी काळभोर पोलिसांनी धिरज विठ्ठल काळभोर (वय -३६ शेती रा. कदमवाकवस्ती ता हवेली) या इंधन माफियासह, अमिर मलिक शेख (वय-३२, धंदा ड्रायव्हर रा. कदमवाकवस्ती लोणीकाळभोर, मुळ गाव मु. पो पिंपळे ता. बार्शी जिल्हा सोलापुर), सचिन भाऊराव सुरवसे (वय-३० धंदा हेल्पर रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर ता हवेली जिल्हा पुणे मुळ रा. भाळवणी जेऊर ता करमाळा), विजय मारुती जगताप (वय-५२ धंदा- व्यवसाय रा. अंबरनाथ मंदीराजवळ ता हवेली), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१ ड्रायव्हर रा. संभाजी नगर लोणीकाळभोर), धिरज विठ्ठल काळभोर (वय -३६ शेती रा. कदमवाकवस्ती ता हवेली), इसाक इस्माइल मजकुरी (वय ४२ धंदा मजुरी रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी / ४०४, लोणीकाळभोर ता हवेली) या पाच सहकाऱ्यांना पोलिसांनी आटक केली आहे. २०१२ च्या कारवाई मधील यातील काही पोलिस रेकॉर्ड वरील जुनेच गुन्हेगार आहेत.तर इंधन चोरीसाठी जागा उपलब्द करुन दिल्याबद्दल महेश बबन काळभोर वय ४२ धंदा शेती रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर ता हवेली) यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई बाजीराव वीर यांनी फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती येथील भारत टायर्स या दुकानाच्या पाठीमागील जागेत दोन टॅकरमधुन पाच ते सहा जण टँकरमधुन चोरुन इंधन काढत असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीची दाखल घेत वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व सहायक पोलिस निरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना धिरज काळभोर व त्याचे सहकारी इंडीयन ऑईल कंपणीच्या दोन टँकरमधुन चोरुन पेट्रोल व डिझेल काढत असल्याचे पोलिसांना जागेची तपासणी केली असता, पोलिसांना आरोपींकडून इंधन भरलेले २ टँकर, ७ मोबाईल फोन, लोखंडी सळई, चोरलेले इंधन असा ७९ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कारवाई रोखण्यासाठी अनेकांनी भरपूर तारेवरची कसरत करून देखील राजकीय दबाव न जुमानता...एक आदर्श कर्तव्य निभावले. या साठी लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक निघत आहे.. खरंच लोणी काळभोर ला हि (सिंघम)मिळाले असे सर्व सामान्य लोकांना वाटू लागले आहे.