पिंपरखेड प्रतिनिधी : प्रफुल्ल बोंबे
बेट भागातील पिंपरखेड, काठापूर खुर्द, जांबूत, वडनेर खुर्द, फाकटे आदी परिसरात रविवार (दि.९) रोजी कोजागिरी पोर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरखेड येथे तुकाईदेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भव्य रासदांडियांचे आयोजन करण्यात आले होते. तर जांबूत येथे जय हनुमान महिला मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी रूपाली राऊत यांनी प्रथम, अनिता राऊत यांनी द्वितीय तर अनिता पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी सुमित मुंडलीक, गणेश कदम, बाळासाहेब पवार यांचेकडून बक्षीसे देण्यात आली. पिंपरखेड येथे तुकाईदेवी मित्रमंडळाच्या वतीने तर जांबूत येथे माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, संतोष रणसिंग, संदिप थोरात,राजेंद्र लुनिया, अशोक गाडेकर यांचे वतीने सुगंधी दुधाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.