प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
विधान परिषदेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये समाविष्ट असलेला वरुडे ते गणेगाव हा शिरूर तालुक्यातील रस्ता सहा महिन्यापूर्वीच अनेक अडचणींवर मात करत खूप वर्षांनी करण्यात आला होता परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी रस्त्याची देणे अवस्था होऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आले आहे,
मोराची चिंचोली या पर्यटन स्थळी जाण्यासाठी शिक्रापूर मधून हा रस्ता गणेगाव मार्गे जात असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना पुन्हा कसरत करण्याची वेळ आली आहे. रस्ता बनवणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
अन्यथा पुन्हा कमीत कमी पाच वर्षे नागरिकांना या खराब रस्त्याचा जिकिरीचे सामना करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांना या विषयी लवकरात लवकर निवेदन देऊन ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे,