सुनील भंडारे पाटील
वाघोली येथील गट नंबर 1123 मधील दोन हेक्टर जागा पुणे जिल्हा न्यायालयाने न्यायालय उभारण्यासाठी मागितली आहे. यासाठी आठवडे बाजाराची मोकळ्या जागेची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख व न्यायालयाचे अधिकारी आले होते.मात्र आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,शेतकरी सह आदी वाघोली वाघोलीकरांनी या बाजार मैदान जागेला विरोध केला असल्याचे माहिती देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा वाघोलीचे माजी सरपंच रामदास दाभाड़े यांनी सांगितले.
वाघोली(ता.हवेली) शुक्रवारी आठवडे बाजाराची मोकळ्या जागेची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख व न्यायालयाचे अधिकारी आले होते.मात्र हे समजताच तेथे वाघोलीतील लोकप्रतिनिधी,विविध पक्षांचे पदाधिकारी,व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहुन तीव्र विरोध दर्शविला.व आलेल्या अधिकारी यांच्या समवेत याबाबत चर्चा करण्यात आली.
त्यामुळे मोजनी न करताच अधिकाऱ्यांना पुन्हा परतावे लागले.जिल्हा न्यायाधीश यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वाघोली येथे दोन हेक्टर जागेची मागणी केली.जिल्हाधिकारी यांनी गट नंबर 1123 मधील न्यायालयाला जी जागा योग्य वाटेल ती मोजणी करावी.असे पत्र भूमिअभिलेख कार्यालय न्यायालय व महसूल विभागाला मोजणी करण्याचे पत्र दिले.त्यानुसार भूमिअभिलेखचे अधिकारी कर्मचारी, न्यायालयाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी व कर्मचारी आले. दैनंदिन आठवडे बाजाराची जागा त्यांना योग्य वाटल्याने त्यांनी त्या जागेची मोजणी करायचे ठरवले.
नागरिकांचा विरोध पाहता अधिकाऱ्यांनी मोजणी रद्द केली.त्यानंतर याबाबत नागरिकांचा जबाब घेण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी सरपंच रामदास दाभाडे,वाघोलीचे माजी सरपंच शिवदास उबाळे,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा माजी उपसरपंच संजय सातव पाटील,किसन जाधव,विठठल शिवरकर,माजी उपसरपंच महेंद्र भाडळे,किशोर सातव,अतुल शिंदे,सागर जाधव,दीपक काळे,भारत सातव यासह अनेक शेतकऱ्यांनी व विक्रेत्यांनी विरोध दर्शवत जबाबावर सह्या केल्या.
[गट नंबर 1123 मधील ही जागा सुमारे 30 ते 35 वर्षांपासून बाजारासाठी वापरली जाते.येथे आठवडे व दैनंदिन बाजार भरतो.वाघोलीच्या तीन लाख लोकसंख्येला भाजीपाला खरेदी व शेतकऱ्यांना रोजी रोटीचे साधन आहे.त्यामुळे हे मैदान वगळता गटातील अन्य जागा घेण्यास आमची हरकत नाही. या जागेचा आग्रह धरल्यास तीव्र विरोध करू. --संजय सातव पाटील,माजी सदस्य - जिल्हा नियोजन समिती]
[जुन्या काळपासून जागा हि बाजारासाठी वापरली जाते.तसेच बाजाराबरोबर येथे क्रिकेट व इतर् खेळासाठी क्रीड़ांगनही उपलब्ध आहे.आजवर या जागा परिसरात मोठी विकासकामे झाली आहेत.त्यामुळे वाघोलीकरांच्या दृष्ठीने हि जागा महत्वपूर्ण आहे. हि जागा न्यायलय किंवा अन्य कोणत्याही शासकीय कार्यालयाना देण्याबाबत वाघोलीकरानी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे.वेळ आली तर मोठे जन आंदोलन उभारण्यास आम्ही तयार आहोत. --शिवदास उबाळे,माजी सरपंच-वाघोली]