लोणीकाळभोर ला काकड आरती भक्तीमय वातावरणात साजरी

Bharari News
1 minute read
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
      लोणी काळभोर (तालुका हवेली),येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षी कार्तिक महिन्यात मोठ्या उत्साहात पहाटे काकड आरती केली जाते. काकड आरती म्हणजे एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी समजूत आहे.       
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर सूर निनादत असतो.
एकेकाळी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठे होते. परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली. आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात. विठ्ठल मंदिरातील काकड आरतीमध्ये टाळ, मृदुंग यांच्या तालावर भजने सादर होतात.विठ्ठलाला,दूध,दही,साखर,मध यांचा अभिषेक करण्यात येतो ,ग्रामस्थ अगदी जोडी ने देवाचा अभिषेक करतात.यावेळी, पत्रकार अनिकेत अंकुश मुळीक परिवार ,काळभोर परिवार ,दिनकर शिंदे परिवार, बांबे परिवार,अनंत शेळके परिवार, हे आजचे अभिषेक करते होते.त्याच बरोबर रामदरा स्थळाचे.. १००८ म हं त हेमंत पुरी महाराज....ह.भ. प विनोद महाराज , व लोणी काळभोर ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा सोहळा पार पडतो.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 22, June 2025