सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
जेजुरी येथील खंडोबा मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी झाली होती...शालेय विद्यार्थ्यांना असलेली दीपावलीची सुट्टी आणि चाकरमान्यांना असलेली रविवारची सुट्टी यामुळे आज रविवारी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
आज हजारो भाविकांनी जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शन घेतलंय.त्यामुळे जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे प्रांगण गजबजुन गेलं होत. शहरातही भाविकांची गर्दी दिसून येत होती. रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळत होते.जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शन घ्यायला राज्य भरातून लोक येत असतात.त्याच बोबर शेजारचे कर्नाटक आंध्रप्रदेश अशा विविध राज्यातून ही भाविक भक्त खंडोबाच्या दर्धनाना येत असतात. सद्या खंडोबाच्या भाविक भक्तांमध्ये मोठी वाढ झालीय तर अनेक भागातून लोक पर्यटनासाठी सुध्धा जेजुरीत येत असतात.