रांजणगाव गणपती प्रतिनिधी
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर) या अष्टविनायकातील महागणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.रांजणगाव गणपती या क्षेत्रास त्रिपुरारी पौर्णिमेचे विशेष महत्त्व असल्यामुळे मंदिर परिसरात हजारो पणत्या उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दीपोत्सवात विविध प्रकारचे नावांची रांगोळी देवस्थान ट्रस्ट चे जनसंपर्क अधिकारी श्री. रमाकांत शेळके यांनी रेखाटली होती. आकर्षक रांगोळी व हजारो पणत्यांचे दीप प्रज्वलन भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त महागणपती च्या मूर्तीस आकर्षक सुवर्णलंकार व पोशाख परिधान करण्यात आला होता. तर गणेश भक्त डॉ. सुनील शेळके व संतोष शेळके यांचे वतीने फुलांची सजावट व संत्र्यांच्या महानैवेद्य श्रींचे चरणी अर्पण करण्यात आला.
*सायंकाळी दीपोत्सवानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पत्नी सौ. नीलम सामंत यांचे हस्ते आरती करण्यात आली*
यावेळी देवस्थान चे विश्वस्त ॲड. विजयराज दरेकर, डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे , पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी, देवस्थान कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.