सुनील भंडारे पाटील
श्री रामचंद्र अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालय लोणीकंद (ता हवेली) पुणे, येथे एकदिवसीय रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य स्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे,
तंत्र शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटना अंतर्गत एक दिवशीय घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात राज्यामधील अभियांत्रिकी विद्यालयातील सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, राज्यस्तरीय क्रीडा विभागातून या महोत्सवासाठी आपल्या पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत असलेले श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग लोणीकंद ची निवड करण्यात आल्याने आपले भाग्य आहे,
या स्पर्धेत खोखो, टेबल टेनिस, कॅरम या खेळांचा समावेश असणार आहे,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी या स्पर्धा घेतले जात असल्याचे संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष मारुती (बापू) भुमकर यांनी सांगितले, या एक दिवशीय राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, संचालक तंत्र शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य डॉ अभय वाघ, संचालक म,रा, तंत्र शिक्षण मंडळ डॉ विनोद मोहितकर, प्राचार्य तथा अध्यक्ष आई डी एम एस ए पुणे डॉ विठ्ठल बांदल, व अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार आहे,