गुनाट प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातील कोळपेवाडी, सरकेवस्ती, परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार बिबट्याने धुमाकूळ घातला होता बिबट्याने कोळपेवाडी भागात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार मारले होते,
वारंवार दर्शन देत होता कोळपेवाडी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उसाला पाणी देण्यासाठी शेतकरी वर्गाला संकटाला सामना करावा लागत होता त्यामुळे पशुपालक,शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या सर्व घटनांबाबत शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुनाट येथील कोळपेवाडी परिसरात शेतकरी भाऊसाहेब लिंबा कोळपे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून देण्यात आला होता व बिबट्याला पकडण्याचा सापळा लावण्यात आला होता अखेर (दि.६) रोजी पहाटे ४ च्या सुमारास बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला या घटनेबाबत मा.सरपंच गणेश कोळपे, भाऊसाहेब कोळपे यांनी वनसेवक नवनाथ गांधले यांच्याशी संपर्क करून बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची महिती दिली.बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले परंतु कोळपेवाडी परिसरात अजूनही २ बिबटया पिंजऱ्याशेजारी पाहिल्यामुळे पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी कोळपेवाडी, सरके वस्ती परिसरातील शेतकरी वर्ग व गुनाट ग्रामस्थांनी केली आहे