वडगाव प्रतिनिधी - सुभाष पाचारणे
बाल आनंद मेळाव्यातून व्यवहार ज्ञान, गणितीय ज्ञान, संभाषण कौशल्य यांचा विकास होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे सेवानिवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी भरत किंद्रे यांनी सांगितले. बालवडी (ता.भोर ) येथील जिल्हा परिषद शाळा आयोजित बाल आनंद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेल्या फळे व भाजीपाल्याची खरेदी करुन, खाद्य पदार्थांची चव शिक्षक व पालक यांनी चाखली.
मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी भरत किंद्रे व सरपंच सुवर्णा किंद्रे यांचे हस्ते झाले.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे, प्राचार्य शामराव शिंदे,शा.व्य.समिती अध्यक्ष संतोष किंद्रे, उपसरपंच मच्छिंद्र फणसे, वि.का.सोसायटी चेअरमन बाळासाहेब फणसे उपस्थित होते.
मैदानावर भाजी बाजार व खाद्य पदार्थांचे स्टॅाल विद्यार्थ्यांनी लावले होते.या पदार्थांची विक्री करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये दिसलेच याशिवाय त्याची किंमत, ग्राहकाने दिलेले पैसे, उरलेले परत द्यायचे पैसे असा बिनचूक हिशोब करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणितीय ज्ञानाबरोबर संभाषण कौशल्य विकसित झाल्याचे मुख्याध्यापक भिमराव शिंदे, महादेव बदक, आनंदा सावले, अंजना कोंढाळकर या शिक्षकांनी सांगितले.
यावेळी अनिता किंद्रे,मंजुश्री किंद्रे,मंगल घोलप,भिकू शिंदे,बापू निकम,महेंद्र किंद्रे,अर्जुन किंद्रे,लक्ष्मण भोसले,तुषार गायकवाड.मेळाव्यास गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे,केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे,विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.