अमृता फडणवीस यांचा गौप्य स्फोट - नवीन भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी- पहा व्हिडिओ 

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
            आपल्या राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी आता नवीन मुद्द्याला कलाटणी दिली असून चक्क त्यांनी आपल्या देशाचे आत्ताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी असल्याचे ठाम मत व्यक्त केले आहे,          
सद्यस्थितीत देशामध्ये तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महापुरुषांबाबत लोकनेत्यांकडून सतत वादग्रस्त विधाने होत आहेत, त्यामुळे सर्वत्र वातावरण अगोदरच तापलेली आहे, अनेक ठिकाणी शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये गेल्या आठवड्यात आंदोलन देखील झाले आहेत, त्यात आता राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवीनच गौप्य स्फोट  केला आहे, अमृता फडणवीस यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात मोठे विधान केले, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत, तर नरेंद्र मोदी हे देखील भारताचे नवीन राष्ट्रपिता आहेत, गांधी हे तत्कालीन राष्ट्रपिता होते, तर मोदी हे भारताचे नवीन राष्ट्रपिता आहेत, असे विधान त्यांनी केले, त्यामुळे आता देशात नवीन वादाला चितावणी मिळते काय? की अमृता फडणवीस यांनी केलेले विधान योग्य आहे, हे आता येणारा काळच ठरवेल, एकंदरीत देशाचे राजकारण व परिस्थिती नुसार होणारे नवीन बदल, हे आगामी काळात जनतेला पाहायला मिळणार आहेत, अमृता फडणीस यांच्या विधानाने देशामध्ये एक नवीनच चर्चेचा विषय तयार झाला आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!