सुनील भंडारे पाटील
सध्या राज्यामध्ये राजकारणी हे युगपुरुष, देवाधर्मावर टीका करून, चुकीचे वक्तव्य करून लोकांच्या भावना दुखवत आहेत, तरुणांची माथी भडकवत आहेत, ज्येष्ठ इतिहास तज्ञ पानिपतकार विश्वास पाटील यांनी अपुऱ्या बुद्धीच्या या राजकारण्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे,
पाटील यांनी सांगितले की धर्मवीर या उपाधी विषयी लोकांकडून मला विचारणा होत होती की धर्मवीर ही उपाधी केव्हापासून होती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी धर्मवीर हा उच्चार गेल्या 105 ते 110 वर्षापासून आहे,1917 मध्ये प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार नाथ माधव यांनी पहिल्यांदा नाटक लिहिलं त्यामध्ये धर्मवीर हा उल्लेख करण्यात आला,1929 मध्ये शाहीर पांडुरंग खाडीलकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या नावाने पोवाडा महाराष्ट्रभर अत्यंत गाजला, 1942 च्या दरम्यान आणखी एक धर्मवीर शंभूराजे नावाने नाटक आलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने पूर्वी धर्मवीर या शब्दाचा उल्लेख झालेला आहे, आणि जसं आपण लोकमान्य यांना लोकमान्य म्हणतो, गांधीजींना महात्मा म्हणतो, तसं धर्मवीर संभाजी महाराज हा उल्लेख 100 सव्वाशे वर्षांपूर्वीचा आहे, ज्यावेळी मताचे राजकारण नव्हतं, एक गठ्ठा मतदान नव्हते, जातीचा विचार नव्हता पक्षाचा विचार नव्हता, तेव्हापासूनचा धर्मवीर हा उच्चार आहे, स्वराज्य रक्षक हे शीर्षक अमोल कोल्हे यांनी आपल्या मालिकेला दिले आहे तसा हा शब्द फार रुडार्थी नाही , लोकमान्य यांनी देखील त्यावेळी शंभूराजांना हुतात्मा असे संबोधले होते, शंभूराजांच्या बाबतीत अशा अनेक शब्दांनी संबोधले गेले आहे, मला या गोष्टीचा अतिशय संताप येतो की धर्मासाठी शंभूराजांनी हावतात्म्या पत्करलं,औरंगजेबाने शंभूराजांना हाल हाल करून मारलं, त्या औरंगजेबाचे, अफजलखानाचे कौतुक समाजात जाणते पुरुष करत आहेत ही धक्कादायक बाब आहे, औरंगजेब आणि अफजल खान आपले शत्रू नव्हते तर मग शत्रू होते कोण?