खेड प्रतिनिधी लतीफ शेख
राष्ट्र चेतना जागृती मंडळ राजगुरुनगर यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बाफना रंगमंदिर खेड या ठिकाणी स्थूलता व मधुमेह या विषयावरील व्याख्यानाला संपन्न झाली,
व्याख्यानमालेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजगुरुनगर बँकेचे नवनिर्वाचित संचालक किरण आहेर राष्ट्र चेतना जागृती मंडळाचे अध्यक्ष शरदराव सोनटक्के व जिल्हा संघ अध्यक्ष डॉक्टर भोसले सुधाताई कोठारे व जिल्हा संघप्रमुख अरुण साळुंखे शंकर साळुंके रोहिदास गडदे व राजगुरुनगर मधील अनेक श्रोते उपस्थित होते आजच्या काळातील जीवनशैलीमुळे स्थूलता व डायबिटीस यांच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे यासाठी डॉक्टर दीक्षित पॅटर्न म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर दीक्षित यांनी आपल्या व्याख्यानमाला मध्ये याबाबत काही सूत्र व नियम सांगितले,
त्यामध्ये दिवसातून फक्त दोनच वेळा जेवणे दोन जेवणाच्या दरम्यान ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी पाणी ताक शहाळे किंवा एकच टोमॅटो घ्यावे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी फक्त पाणीच प्यावे या पद्धतीद्वारे तीन महिन्यातून पाच किंवा सहा किलो वजन कमी होऊन मधुमेहाची तीव्रता ही कमी होते असा जीवनशैलीतील महत्त्वाचा मूलमंत्र या व्याख्यानातून दिला या जीवन शैली सह आहारातील गोड पदार्थ कमी करा प्रथिने कार्बोधके खा दररोज व्यायाम 45 मिनिट करा अशा महत्वपूर्ण टिप्स व्याख्याना द्वारे राजगुरुनगर करांना डॉक्टर दीक्षित यांनी केला
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली,