सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र कोरेगाव भीमा पोलिसांच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात आली,
पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा या ठिकाणी वाहतुकीची समस्या, कोंडी, विरुद्ध दिशेने येणारे वाहनांमुळे सतत होत असल्याने, या वाहतुकीच्या समस्येला नागरिकांना सतत तोंड द्यावे लागते, विशेषतः आठवड्याच्या दर गुरुवारी बाजार असल्याने या दिवशी तर खूपच वाहनांची कोंडी होते, डिंग्रजवाडी फाट्याकडून येणाऱ्या, तसेच वाडेगाव फाट्याकडून रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असल्याने,
याचा वाहतुकीवर परिणाम होत असून, वाहतुकीची कोंडी होत असल्याने, ही बाब शिक्रापूर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर, आज शिक्रापूर पोलीस स्टेशन संचलित कोरेगाव भीमा पोलीस मदत केंद्राच्या वतीने वाडेगाव आणि डिंग्रजवाडी फाटा कडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली, असे सहाय्यक फौजदार अविनाश थोरात, पोलीस नायक महेंद्र पाटील यांनी सांगितले तसेच त्यांनी स्वतः कोरेगाव भीमा चौकामध्ये उभे राहून कारवाई केली,