आळंदी आरिफ भाई शेख
लाखोंच्या संख्येने भरणारा वैष्णवांचा मेळा अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदी देवाची मध्ये आघोरी प्रकार घडलेचे दिसून आले आहे.द्राक्षाचे लाल रंगाचे पाणी करून येशु चे रक्त समजून पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न आळंदीच्या साठे नगर या ठिकाणी घडला,
सुधाकर बाबुराव सूर्यवंशी यासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माऊलींच्या आळंदी मध्ये वर्षानुवर्ष वैष्णवांचा मेळा भरतो. वैष्णव धर्म. विष्णुमय जग. अशी ख्याती असलेल्या आळंदीमध्ये जातीभेद, जात, धर्म, हा पालखी सोहळ्यामध्ये मानला जात नाही, आळंदीला मुळात ती ओळखच नाही,आळंदीमध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात,परंतु ख्रिश्चन धर्म यांच्या पादरीच्या कडून घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र नापसंती आणि असंतोष नागरिकांमध्ये पाहण्यास मिळत आहे, याबाबत आळंदी पोलीस स्टेशन गुन्हे विभागाचे एपीआय रमेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून. पुढील तपास सुरू आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, साठे नगर परिसरामधील कांबळे यांनी दिलेली फिर्यादीनुसार, सुधाकर बाबुराव सूर्यवंशी आणि त्याचे दोन साथीदार काही स्थानिकांना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने आपले आजार बरे होते, म्हणून आमिष दाखवून.तसेच तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक गरजा, आरोग्याच्या समस्या दूर होतील, हिंदू धर्म सोडून, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, असा आग्रह धरत असल्याचे पोलिसांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, ख्रिश्चन धर्मात येण्याचा आग्रह केला गेला म्हणून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत आळंदीकरांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे, मुळात आळंदीमध्ये जातीवादाला थारा नसताना अशा प्रकारचे धर्मांतरांचे प्रकार घडले, हे आळंदीला लागलेला कलंक , लांचनास्पद असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे, आळंदी पोलीस स्टेशनचे एपीआय गुन्हे विभाग रमेश पाटील हे पुढील तपास करत आहेत