माणुसकी राजगुरुनगरची

Bharari News
0
खेड प्रतिनिधी लतिफ शेख 
        माऊली सेवा प्रतिष्ठान,राजगुरुनगरच्या वतीने राजगुरुनगर आणि परिसरातील 
गरजूंना रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी गढई मैदान येथे मोफत कपडे वाटप करण्यात आले. या कामी भोपाळबुवा  महाराज तरुण मित्र मंडळ, BMCC Grup राजगुरुनगरचे विशेष सहकार्य लाभले.  
    माऊली सेवा प्रतिष्ठान राजगुरुनगरच्या वतीने दिवाळीत मोठ्या प्रमाणात राजगुरुनगरमधील नागरिकांकडुन जुने परंतु वापरण्यायोग्य चांगले कपडे गोळा करण्यात आले होते. त्या कपड्यांचे वाटप दुर्गम भागात आंबोली टेकवडी औदर येथील कातकरी ठाकरवाडी वस्तीत  केल्यानंतर राजगुरुनगर आणि परिसरातील गरजूंनी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक कैलास दुधाळे यांच्याकडे आम्हाला देखील कपडे मिळावेत अशी आशा व्यक्त केली. 
  त्यानुसार दिवाळीनंतर सुध्दा नागरिकांकडुन कपडे गोळा करण्याचे काम सुरु ठेवण्यात आले असता आजपर्यंत मोठ्या प्रमाणात कपडे गोळा करण्यात आले होते. जमा झालेल्या कपड्यांचे व्यवस्थीत रित्या सॉर्टींग करण्यात आले कपडे सॉर्टींगमुळे ५ महिलांना रोजगार उपलब्ध झाला.
      कपड्यांची एकुण ४० पोती तयार झाली असता सर्व कपड्यांचे वाटप रविवार दिनांक २२/०१/ २०२३ रोजी गढई मैदान येथे गरजूंना करन्यात आले. गरजूंना मोफत  कपडे वाटपाची माहिती व्हावी याकरिता राजगुरुनगर आणि परिसरात रिक्षा स्पीकरद्वारे माहिती देण्यात आली होती. मोफत कपडे वाटप वेळी गरजूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे सकाळी १० ते १२ या दोन तासातच जवळपास सर्व कपडे संपले गेले. गोर गरीब गरजूंना कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडुन वाहत होता.   
  या वेळी भोपाळबुवा महाराज तरूण मित्र मंडळासह सामाजिक कार्यकर्ते Bmcc गृपचे अध्यक्ष राहुलदादा पिंगळे पिंटु गावडे नरेंद्र कानडे संजय घुमटकर सर नामदेव कुंभार मछिंद्र पवळे पत्रकार नाझीमभाई ईनामदार वैभव वाघमारे दिलीप राक्षे दयानंद तळेकर सुधीर येवले मंगेश रोंघे नितीन कोहिनकर सुनिल सातव दता रुके कैलास मुसळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई गाडगे लक्ष्मी सातव सपना ढोबळे प्राजक्ता बच्छाव मनीषा कुलकर्णी यांचे अनमोल सहकार्य लाभले.खेड तालुक्यातील  गरजूंना कपडे मिळावेत यासाठी वर्षभर कपडे गोळा केले जानार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!